
सिरोंचा : तालुक्यातील बालमुत्यमपल्ली येथील रहिवासी तसेच राजे अम्ब्रिशराव आत्राम यांचे कट्टर समर्थक पाले चंद्रय्या यांची मातोश्रीचे (आई) ही दीर्घ आजाराने निधन झाले. पण कुटुंबातील आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने तेरवीचा कार्यक्रम करण्यासाठी आर्थिक प्रश्न निर्माण झाला होता.
स्थानिक कार्यकर्त्यांनी पाले चंद्रय्या यांची आर्थिक अडचणी विषयी प्रश्न अहेरी इस्टेटचे दानशूर राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या पर्यंत पोहोचविला. त्यावेळी राजे आत्राम यांनी आपले स्थानिक कार्यकर्ते पाठवून तेरवी कार्यक्रमासाठी पाले चंद्रय्या यांच्या कुटूंबाला आर्थिक मदत केली. पाले चंद्रय्या यांच्या कुटूंबाने राजे आत्राम आभार मानले.
यावेळी शंकर नरहरी भाजपा तालुका अध्यक्ष सिरोंचा तथा पेंटीपाकाचे उपसरपंच, तालुका उपाध्यक्ष चंद्रन्ना सदनपू, सडवली लंगारी, बुथ प्रमुख महेश दंदेरा तसेच स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.



