गडचिरोलीविदर्भ

गोंडवाना सैनिकी विद्यालयातर्फे एनडीए लेखी परीक्षा उत्तीर्ण आस्तिक संग्रामे याचा सत्कार

गडचिरोली : संघ लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या (NDA) परीक्षा घेण्यात येते. यातील लेखी परीक्षेमध्ये शहरातील आस्तिक ओमप्रकाश संग्रामे या विद्यार्थ्याने चांगले गुण संपादन करून लेखी परीक्षा उत्तीर्ण केली आहे व मुलाखती करिता पात्र झाला आहे. विशेष म्हणजे गोंडवाना सैनिकी विद्यालयातील उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे यांचा तो मुलगा आहे.

या परीक्षेत प्राथमिक स्वरूपात दोन पेपर असतात. ज्यात गणित (Mathematics) आणि सामान्य क्षमता चाचणी (The General Ability Test) हे पेपर असतात तर यानंतर हे पेपर पास करणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाते. यातील प्राथमिक लेखी परीक्षा आस्तिकने लेखी परीक्षा उत्तीर्ण केल्यामुळे त्याचे स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालयातर्फे शाल, पुष्पगुच्छ, पुस्तक भेट देवून विद्यालयाचे पर्यवेक्षक अजय वानखेडे, प्राध्यापक डॉ. राकेश चडगुलवार, यांच्या हस्ते सत्कार व सन्मान करण्यात आला व पुढील वाटचाली करिता शुभेच्छा देण्यात आल्या.

दरम्यान अभ्यासातील सातत्य हेच यशाचे गमक असल्याचे आस्तिक मार्गदर्शन पर भाषणातून बोलत होता. एनडीए तील लेखी परिक्षा जरी 11 वी नंतरच घेतली जाते. तरी याची पूर्व तयारी हि खूप आधीपासूनच करावी लागते. आणि दोन लेखी परीक्षेनंतर मला हे यश मिळाले आहे असे तो म्हणाला. इथपर्यंतचा प्रवास हा खडतर होताच पण यानंतर असलेल्या SSB म्हणजे मुलाखती करिता तयारी करणे हेही तेवढेच कठीण आहे. पण कठीण परिश्रमाने सारे काही साध्य होते असे मला माझे गुरु माझे वडील सांगतात म्हणून याही पेक्षा अधिक सराव करून मी पुढील टप्पा सुद्धा पार करण्याचा प्रयत्न नक्कीच करीन असेही तो म्हणाला. हे सैनिकी विद्यालय असल्यामुळे या विद्यालयातील सुध्दा अनेक विद्यार्थी एनडीए मधून अधिकारी नक्कीच व्हावेत्त अशी मनापासून इच्छा आहे त्याकरिता हवी असलेली मार्गदर्शनाची मदत मी करायला तयार आहे. असे मत त्याने व्यक्त केले.

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे परीवेक्षक अजय वानखेडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य ओमप्रकाश सांग्रामे, प्रा. डॉ. राकेश चडगुलवार हे होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. गजानन ढोले यांनी केले कार्यक्रमाला वर्ग ११ व १२ चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button