
मूलचेरा : तालुक्यातील लगाम क्षेत्रातील येल्ला गावातील संगीता गंगाराम पानेमवार यांची प्रकृती अनेक महिन्यापासून खराब असल्याने उपचारासाठी आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने कुटूंबातील सदस्य पुढील उपचार खाजगी रुग्णालयात कसा करावा? या विवंचनेत होते. अहेरी इस्टेटचे दानशूर राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांना ही बाब कळताच त्यांनी आपल्या स्थानिक कार्यकर्त्यांना पाठवून पानेमवार कुटूंबाला धीर दिला आणि संगीता गंगाराम पानेमवार यांचा पुढील उपचार खाजगी रुग्णालयात करण्यासाठी आर्थिक मदत केली. आपण पुन्हा सर्वोतोपरी सहकार्य करू असे आश्वासन दिले. यावेळी संपूर्ण पानेमवार कुटूंबाने राजे आत्राम आभार मानले.
याप्रसंगी लगाम क्षेत्राचे सामाजिक कार्यकर्ते वैष्णव ठाकूर, रामदास टेकुलवर, मल्ला पानेमवार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



