गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश!

सिरोंचा तालुक्यातील आसरअली, अंकीसा भागातील कार्यकर्त्यांचा समावेश

मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा टाकून केले स्वागत

अहेरी : ऐन निवडणुका तोंडावर असताना सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली, अंकीसा येथील काँग्रेस पक्षाचे व इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी रविवार, 6 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या निवासस्थानी पक्ष प्रवेश केला. मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी पक्षाचा दुप्पटा टाकून प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.

राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष रियाज शेख यांच्या नेतृत्वात सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली, अंकीसा जिल्हा परिषद क्षेत्र सर्कलतील काँगेस पक्षाचे पापा सेट यांच्या मार्गदर्शनात येथील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) प्रवेश केला. पक्ष प्रवेश करणाऱ्यांमध्ये गोमासे लसमया, गोमासे मोंडी, गोदारी मंतया,बेडके जंपया, गोदारी लस्मया, जोडे सिकंदर, रेकाम सागर, गोवासी बुचाम, दुर्गम श्रीवास आदींचा समावेश आहे.

नडीगुडा, कोत्तापल्ली, चिंतरवेला, माडेम समया, माडेम सागर, गुमपुला राम, कलवा श्याम, पुतला कल्याण, माडेम अंजी, पूतला अजय, महिंद्र जाडी, सापडी विनोद, माडेम कमलाकर, कुम्मरी नवीन, दुर्गम सेखर, सदनपू रामय्या, साजिद शेख, गुंपुला सारय्या, गज्जेला सडवली, अजिज्ञ शेख, बेडके बापू, गोमासे सारय्या, दुर्गम सारय्या, बेडके सारवेल्ली आदी व असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश केले.

आता लवकरच विधानसभा निवडणुकीची आचार संहिता लागणार असून ऐन विधानसभा निवडणुक तोंडावर असताना सिरोंचा तालुक्यातील आसरअली, अंकीसा व परिसरातील अन्य पक्षातील कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) प्रवेश केल्याने पक्षाला अजून एक नवे बळ, उभारी व ताकद मिळाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button