गडचिरोलीविदर्भ

राणी दुर्गावती जयंती व समाज प्रबोधन कार्यक्रम उत्साहात

गडचिरोली : गोंड समाज संघटना, जिल्हा गडचिरोलीच्या वतीने 05 ऑक्टोबर रोजी वीरांगणा राणी दुर्गावती जयंती व समाज प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रम गडचिरोली येथील अभिनव लॉन, चंद्रपूर रोड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

गडचिरोली येथील आयटीआय चौक गोटुल भुमी येथील सल्ला गागराचे माल्यार्पण माजी खासदार अशोक नेते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी यांच्या हस्ते होऊन, रॅली काढण्यात आली.

कार्यक्रमाला माजी आमदार हरिराम वरखडे, जंगल कामगार सोसायटीचे अध्यक्ष पूर्णचंद्र रायसिडाम, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी आमदार हिरामण वरखडे, ग्रामसभेचे अध्यक्ष देवाजी तोफा, डॉ. प्रमोद खंडाते, आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार आनंदराव गेडाम, डॉ. मिलिंद नरोटे, डॉ. चंदा कोडवते, डॉ. सोनल कोवे, डॉ. नितीन कोडवते, वर्षा आत्राम, पुष्पलता कुमरे, संगीता उसेंडी, माजी नगरसेवक गुलाब मडावी, राजेश नैताम, आनंद कंगाले, सदानंद ताराम, नंदकिशोर नैताम, डॉ. ताराम, डॉ. चेतन कोवे, लालाजी उसेंडी, कोवे महाराज, कोकोडे महाराज, नाजुकराव पदा, गणेश हलामी, संदीप वरखडे, कांता हलामी, दिलीप मडावी, छगन पेंदाम, ममता हिचामी, संजय गावडे, प्रशांत मडावी, श्रीमती दुगा, किरंगे, कोडापे, कोटरंगे, आदी मान्यवर व मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांकडून राणी दुर्गावती यांच्या पराक्रमाची आणि त्यागाची महती उलगडून सांगण्यात आली. त्यांच्या जीवन कार्याचा गौरव करून, समाजातील मान्यवरांनी त्यांच्या विचारांची आजच्या काळात किती गरज आहे. यावर भर दिला. गोंड समाज संघटनेने राणी दुर्गावती यांचे विचार आत्मसात करून समाजाच्या प्रगतीसाठी, आदिवासी विकास, आदिवासी समस्यांचे निराकरण, आर्थिक सबलीकरण आणि समाजाचा सर्वांगीण विकास या मुद्द्यांवर विशेष भर दिला पाहिजे.

समाजाच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले व आर्थिक सबलीकरणाद्वारे आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक पाऊल उचलण्याचे महत्त्व अधोरेखित केले पाहिजे असे प्रतिपादन डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी केले.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी आदिवासी समाजातील विविध समस्यांचा आढावा घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button