
भंडारा : मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत पंचायत समिती भंडारा येथील शिक्षण विभागातर्फे गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड यांच्या मार्गदर्शनामध्ये प्रभारी विस्तार अधिकारी जी.एस. भोयर, महेश जगनिक, अशोक भुरे, दिलीप सिंगनजुडे, राजेश देशमुख, सोपचंद सिरसाम, संजय माने या तालुकास्तरीय चमूने ग्राम खोकरला टवेपार येथील दुर्गोत्सव उत्सवामध्ये स्वीप अंतर्गत मतदार जनजागृती अभियान राबविला.
याप्रसंगी मतदारांना येणाऱ्या सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 मध्ये आपला मतदानाचा हक्क बजावून मतदानाची टक्केवारी वाढविण्यात यावी असे आवाहन करण्यात आले. सर्वांनी मतदार यादीमध्ये समाविष्ट असलेल्यांनी शंभर टक्के मतदान करावे, याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.



