चंद्रपूरमुख्य बातमीविदर्भ

ब्रम्हपुरी शहरात विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांच्या हस्ते ४.७५ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन

क्रीडांगण, समाज मंदिर व विवीध विकासकामांचा समावेश

ब्रम्हपुरी : राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रा आमदार विजय वडेट्टीवार यांचा विकासात्मक दृष्टिकोन, मतदार संघातील नागरिकांप्रति असलेली तळमळ, आणि शासन स्तरावर सतत पाठपुरावा करण्याचा दीर्घ अनुभव यामुळे आजवर ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात कोट्यावधींच्या विकास कामांना मंजुरी मिळाली असून अत्यंत गरजेची व लोक उपयोगी कामे पूर्णत्वासही आली. सदर क्षेत्राचा ना भूतो न भविष्यती असा विकास साधण्यात विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांना तोड नाही. असे असतानाही त्यांनी आपल्या विकास कामांचा झंजावात कायम राखत ब्रम्हपुरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ४.७५ कोटींचा विकास निधी मंजुर करून या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा पार पडला.

भूमिपूजन सोहळा पार पडलेल्या विकासकामांमध्ये ब्रम्हपुरी शहरातील शांतीनगर बौद्ध विहार परिसरात संरक्षण भिंत, स्वच्छ्ता गृह बांधकाम, पेव्हर ब्लॉक बसविणे अंदाजित किंमत २० लक्ष, मुरलीधर मंदिराच्या बाजूला समाज मंदिर बांधकाम अंदाजित किंमत १५ लक्ष, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडा मैदान विकासित करणे अंदाजित किंमत ३.५० कोटी, मुस्लिम समाज कब्रस्तान येथे विविध विकास कामे करणे अंदाजीत किंमत ९० लक्ष अशा विविध विकासकामे यांचा समावेश आहे.

आयोजित भूमिपूजन सोहळा कार्यक्रमास तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष खेमराज तिडके, जिल्हा सचिव विलास विखार, माजी जिल्हा परिषद सभापति डॉ. राजेश कांबळे, कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती प्रभाकर सेलोकर, काँग्रेस शहर अध्यक्ष हितेंद्र राऊत, जिल्हा उपाध्यक्ष मोंटू पीलारे, युवक काँग्रेस अध्यक्ष सोनू नाकतोडे, नगर परिषद मुख्याधिकारी अर्शिया जुही, तथा काँग्रेस पक्ष सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button