
५३३ विद्यार्थ्यांची शालेय आरोग्य तपासणी
गडचिरोली : स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालय गडचिरोली येथे १७ ऑक्टोबर रोजी वर्ग ६ ते १२ च्या एकूण ५३३ विद्यार्थ्यांची शालेय आरोग्य तपासणी करण्यात आली. राष्ट्रीय बाल स्वास्थ अभियानांतर्गत फिरते रुग्ण्यालयाच्या पथकातील डॉ. एम.एस. चन्नावार व त्यांच्या चमुनी विद्यालयातील विद्यार्थ्यांची आरोग्य व मानसिक तपासणी केली. या उपक्रमाची सुरुवात विद्यालयाचे प्राचार्य संजीव गोसावी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
या पथकाने विद्यार्थ्यांना आरोग्य तपासणी नंतर आहार ग्रहण करण्याची योग्य पद्धत व स्वच्छता, संतुलित आहार नियमित व्यायाम, वैयक्तिक स्वच्छता, आणि व्यसनापासून मुक्तता याविषयी मार्गदर्शन केले. त्वचा, केस व डोळे या संदर्भातील विकाराबद्दल माहिती दिली. आरोग्य शिबीर यशस्वी पार पाडण्याकरिता गजानन अनामुलवार, ब्रदर साहिल, प्रत्येक वर्गाचे वर्गशिक्षक यांचे सहकार्य लाभले. आरोग्य शिबिराच्या आयोजनाचे प्राचार्य संजीव गोसावी, उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखेडे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.



