
मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी दुपट्टा टाकून केले स्वागत
एटापल्ली : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे माजी जिल्हाप्रमुख रियाज शेख व माजी एटापल्ली तालुका प्रमुख मनीष दुर्गे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) प्रदेश उपाध्यक्ष तथा राज्याचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या कार्यावर विश्वास ठेऊन शिवसेना महिला आघाडीचे एटापल्ली तालुका शिवसेना महिला प्रमुख अरुणा निकोडे यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी बुधवार, 16 ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा राज्याचे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घडी चिन्हाचे दुपट्टा टाकून त्यांचे स्वागत केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
ऐन निवडणुकीच्या हंगामात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे महिला तालुका प्रमुख अरुणा निकोडे यांच्यासह असंख्य शिवसैनिकांनी प्रवेश केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (अजित पवार गट) अजून अधिकची ताकद वाढली असून पक्षाची मजबुतीकरण झाले आहे.
महिला तालुका प्रमुख अरुणा निकोडे यांच्यासोबत माया मंडरे, वंदना कुंकलवार, शशिकला फुलसंगे, संगीता ठाकरे, सूरज पुसाली, सचिन दुर्वा आदी शिवसैनिक आणि अन्य पक्षातील कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात(अजित पवार गट) प्रवेश केला.
यावेळी अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र बाबा आत्राम, सिनेट सदस्य तनुश्री आत्राम, युवा नेते हर्षवर्धनराव बाबा आत्राम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, महिला जिल्हाध्यक्षा पुष्पा अलोणे, कार्यकारी जिल्हाध्यक्ष रियाज शेख, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय चेरडुके, नसरू शेख आदी मान्यवर उपस्थित होते.



