गडचिरोलीमहाराष्ट्रमुख्य बातमीमुंबईविदर्भ

विधानसभा निवडणूकीसाठी भाजपकडून पहिली यादी जाहीर ; आरमोरीतून आ. कृष्णा गजबे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी

गडचिरोली व ब्रम्हपुरी विधानसभेची उमेदवारी अद्याप गुलदस्त्यात

गडचिरोली : भाजपाने राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील आरमोरी विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार कृष्णा गजबे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे गजबे आता तिसऱ्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. मात्र सर्वांच्या नजरा लागून असलेल्या गडचिरोली विधानसभेची उमेदवारी अद्याप ‘गुलदस्यात असून भाजपा विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांना तिसऱ्यांदा संधी देणार की अन्य कुणाला उमेदवारी देणार याकडे मतदारांसह भाजपा कार्यकर्त्यांची उत्कंठा शिगेला पोहचली आहे.

त्याचबरोबर गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील चिमूर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार बंटी भांगडिया यांना उमेदवार जाहीर करण्यात आले. तर आमगाव विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार संजय पुराम यांना उमेदवार घोषीत करण्यात आली आहे. मात्र ब्रम्हपूरी व गडचिरोली विधानसभेच्या उमेदवारीचा ‘सस्पेन्स कायम आहे. भाजपा गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील सहा पैकी ५ जागा लढणार आहे. तर अहेरीची जागा महायुती मधील अजीत पवार गटाला गेली आहे

भाजपची पहिली उमेदवार यादी

नागपूर पश्चिम – देवेंद्र फडणवीस, कामठी-चंद्रशेखर बावनकुळे, शहादा – राजेश पाडवी, नंदूरबार – विजयकुमार गावीत, धुळे शहर – अनुप अग्रवाल, सिंदखेडा – जयकुमार रावल, शिरपूर – काशीराम पावरा, रावेर – अमोल जावले, भुसावळ – संजय सावकारे, जळगाव शहर – सुरेश भोळे, चाळीसगाव – मंगेश चव्हाण, जामनेर – गिरीश महाजन, चिखली – श्वेता महाले, खामगाव – आकाश फुफुंडकर, जळगाव (जामोद) – संजय कुटे, पूर्व – रणधीर सावरकर, धामणगाव रेल्वे – प्रताप अडसद, अचलपूर – प्रवीण तायडे, देवली – राजेश बकाने, हिंगणघाट – समीर कुणावार, वर्धा – पंकज भोयर, हिंगना – समीर मेघे, नागपूर दक्षिण – मोहन माते, नागपूर पूर्व – कृष्ण खोपडे, तिरोडा – विजय रहांगडाले, गोंदिया- विनोद अग्रवाल, अमगांव – संजय पुरम, आरमोरी – कृष्णा गजबे, बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार, चिमूर – बंटी भांगडिया, वाणी – संजीवरेड्डी बोडकुरवार, रालेगाव – अशोक उड़के, यवतमाळ- मदन येरवर, किनवट – भीमराव केरम, भोकर – क्षीजया चव्हाण, नायगाव – राजेश पवार, मुखेड – तुषार राठोड, हिंगोली – तानाजी मुटकुले, जिंतूर – मेघना बोर्डीकर, परतूर – बबनराव लोणीकर, बदनापूर-नारायण कुचे, भोकरदन – संतोष दानवे, फुलंब्री – अनुराधा चव्हाण, औरंगाबाद पूर्व – अतुल सावे, गंगापूर – प्रशांत बंब, बगलान – दिलीप बोरसे, चंदवड – राहुल अहेर, नाशिक पुर्व – राहुल दिकाले, नाशिक पश्चिम – सीमाताई हिरे, नालासोपारा – राजन नाईक, भिवंडी पश्चिम – महेश चौघुले, मुरबाड – किसन कथोरे, कल्याम पूर्व – सुलभा गायकवाड, डोंबिवली – रवींद्र चव्हाण, ठाणे – संजय केळकर, ऐरोली – गणेश नाईक, बेलापूर – मंदा म्हात्रे, दहिसर – मनीषा चौधरी, मुलुंड – मिहिर कोटेचा, कांदिवली पूर्व – अतुल भातखलकर, चारकोप – योगेश सागर, मालाड पश्चिम – विनोद शेलार, गोरेगाव – विद्या ठाकूर, अंधेरी पश्चिम- अमित साटम, विले पार्ले – पराग अलवणी, घाटकोपर पश्चिम – राम कदम, वांद्रे पश्चिम – आशिष शेलार, सायन कोलीवाडा- तमिल सेल्वन, वडाळा – कालिदास कोळंबकर, मलबार हिल – मंगलप्रभात लोढा, कुलाबा – राहुल नार्वेकर, पनवेल – प्रशांत ठाकूर, उरन – महेश बाल्दी, दौंड- राहुल कुल, चिंचवड – शंकर जगताप, भोसली -महेश लांडगे, शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोले, कोथरुड – चंद्रकांत पाटील, पर्वती – माधुरी मिसाळ, शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील, शेवगाव – मोनिका राजले, राहुरी – शिवाजीराव कर्डिले, श्रीगोंदा – प्रतिभा पाचपुते, कर्जत जामखेड – राम शिंदे, केज – नमिता मुंदडा, निलंगा – संभाजी पाटील निलंगेकर, औसा – अभिमन्यू पवार, तुळजापूर – राणा जगजितसिंह पाटील, सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख, अक्कलकोट – सचिन कल्याणशेट्टी, सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख, कराड दक्षिण – अतुल भोसले, सातारा – शिवेंद्रराजे भोसले, कणकवली – नितेश राणे, कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक, इचलकरंजी – राहुल आवाडे, मिरज – सुरेश खाडे, सांगली – सुधीर गाडगीळ.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button