१ जानेवारीपासून मेमू, पॅसेंजर गाड्या नवीन क्रमांकाने धावणार

रेल्वे बोर्डाचा निर्णय ; आदी शून्य क्रमांकाने होती सुरुवात
गोंदिया : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत शून्य क्रमांकापासून सुरू असलेल्या सर्व मेमू आणि पॅसेंजर गाड्या स्पेशल गाड्यांच्या स्वरुपात सुरू असलेल्या गाड्या या आता १ जानेवारीपासून नवीन क्रमांकाने धावणार आहेत. यासंबंधीचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळांतर्गत धावणाऱ्या सुभाषचंद्र बोस इतवारी-छिंदवाडा, इतवारी- रायपूर, छिंदवाडा नैनपूर, इतवारी-तिरोडी, तुमसर रोड-तिरोडी, नैनपूर-मंडलाफोर्ट, गोंदिया-तिरोडी, गोंदिया-कटंगी, डोंगरगड-रायपूर, गोंदिया-दुर्ग, इतवारी-गोंदिया, इतवारी-रामटेक, गोंदिया-बल्लारशा गोंदिया-गया, गोंदिया-वडसा-चंद्रपूर या सर्व ७२ मेमू व पॅसेंजर गाड्यांना १ जानेवारी २०२५ पासून त्यांच्या नियमित क्रमांकाऐवजी नवीन क्रमांकाने चालविण्यात येणार आहे. त्यामुळे आता गाड्यांच्या क्रमांकापुढे शून्य लागणार नाही. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.



