महाराष्ट्रमुंबईसोलापूर

संघटनेत अहंकाराला बाजूला ठेवायला शिका – आ. श्रीकांत भारतीय

‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या सोलापूर केडर कॅम्पचा समारोप

सोलापूर : ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या सोलापूर केडर कॅम्पच्या समारोप प्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक आणि विचारवंत आ. श्रीकांत भारतीय यांनी संघटना वाढवताना अहंकार सर्वात मोठा धोका असल्याचे सांगितले. संघटना ही “मी” ने नव्हे, तर “आपण” ने वाढते, असे त्यांनी नमूद केले.

भारतीय यांनी संघटना बळकट करणारी चार मूलतत्वे सांगितली, संपर्क, बैठक, कार्यक्रम आणि निर्णय. संपर्क म्हणजे सतत सदस्यांशी संवाद ठेवणे, बैठक म्हणजे दर आठवड्याला चर्चा करणे, कार्यक्रम म्हणजे वर्षातून एक-दोन अर्थपूर्ण उपक्रम आयोजित करणे आणि निर्णय म्हणजे ठाम व योग्य निर्णय घेण्याचे धाडस.

संघटना टिकवण्यासाठी त्यांनी पुढील विचार मांडले – “जसे कर्णाकडे कवच-कुंडले होते तोपर्यंत तो अजय होता, तसेच संघटनेत श्रद्धा, समर्पण आणि चारित्र्य या ‘कवच-कुंडले’ असल्यास संघटना टिकते. माणसे टिकवायची असतील तर त्यांना दोषांसह स्वीकारा; अवगुणांचा त्याग केल्यानंतरच गुण किमतीचे ठरतात. आयुष्यभर टिकणाऱ्या संघटनेसाठी शब्दपूर्ती (commitment) आणि चारित्र्य अत्यंत महत्त्वाचे आहेत.”

भारतीय यांनी पत्रकारांची भूमिका देखील अधोरेखित केली. पत्रकार समाजाच्या विचारांचे, प्रश्नांचे आणि लोकशाहीच्या नाडीचे परीक्षण करतात. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने राज्यातील पत्रकारांना दिशा, संरक्षण आणि अभिमानाची नवी ओळख दिली आहे, असेही त्यांनी सांगितले.

प्रास्ताविक प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी केले, आंतरराष्ट्रीय सचिव दिव्या भोसले यांनी भूमिका मांडली. व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत रवींद्र चिंचोलकर, शेतकरी नेते रविकांत तुपकर, राष्ट्रीय कोषाध्यक्ष चेतन बंडेवार आणि संचालक व्यंकटेश जोशी उपस्थित होते.

भारतीय यांनी पुढे सांगितले, “आजच्या डिजिटल युगात खोटी माहिती व अफवांचा प्रसार वेगाने वाढला आहे. अशा काळात सत्य, पारदर्शकता आणि लोकहित जपण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’सारखी संघटना आवश्यक आहे. संघटित पत्रकारितेमुळे लोकशाही अधिक निरोगी होते आणि पत्रकार जेव्हा निर्भीडपणे काम करतात, तेव्हा समाज स्वतः बरा होऊ लागतो. पत्रकारांची एकता, जबाबदारी आणि सच्चाई—हीच लोकशाहीचा खरा श्वास आहे.”

या प्रसंगी संदीप काळे यांच्या दोन पुस्तकांचे – ‘जगातल्या पत्रकारितेला लागलेली घरघर’ (मराठी) आणि ‘The Hoarseness of Global Journalism’ (English) – प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

समारोपीय सत्रात संगम कोटललवार यांनी पत्रकारांना मार्गदर्शन करत सांगितले, “पत्रकार कितीही मोठा झाला तरी जमिनीवर राहायला हवे. संघटनेसाठी दररोज थोडा वेळ द्या, तुलना करू नका, स्पष्ट बोला आणि वर्षभराचा ठोस प्लॅन तयार करा.” असे सांगितले.

अजित कुंकूलोळ म्हणाले, “व्हॉईस ऑफ मीडियात प्रत्येकाला आपले ध्येय गाठण्याचे स्वातंत्र्य आहे. अध्यक्ष संदीप काळे प्रत्येक सदस्यासाठी मनापासून प्रयत्न करतात. आपल्यावर सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडा.”

संघटनात्मक बांधणी, नेतृत्व विकसित करणे, एकसंघता आणि तत्त्वनिष्ठ कार्यपद्धती यावर केंद्रित झाले. या सत्रामुळे कार्यकर्त्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आणि केडर कॅम्पचा प्रभावी टप्पा म्हणून ते ठरले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button