रेपनपल्ली येथील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांचा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बाजू अधिक भक्कम

पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम यांनी घडी चिन्हाचे दुप्पटे टाकून पक्षात केले स्वागत
अहेरी : तालुक्यातील रेपनपल्ली येथील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून पक्षाचे उपाध्यक्ष तथा मंत्री ना. धर्मरावबाबा आत्राम यांनी शनिवारी अहेरीच्या राजवाड्यात घडी चिन्हाचे दुप्पटे टाकून स्वागत केले.
विशेष म्हणजे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या कार्यावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते इर्शाद शेख यांच्या पुढाकारातून शुक्रवारी आविसंचे वेडमपल्ली ग्राम पंचायतीच्या एका सदस्यासह अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. शनिवारी अजून इर्शाद शेख यांच्या पुढाकाराने रेपनपल्ली येथील असंख्य सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यामध्ये संभा मिसाल, रवी मिसाल, विजय सिडाम, अजय सिडाम, गंगाराम आलाम, श्रीहरी सडमेक, दीपक सिडाम, संतोष सिडाम, दिवाकर आलाम, विजय गावडे, रितिक गावडे , रमेश मिसाल आदींचा समावेश आहे.
विधानसभा निवडणुकीची वारी सुरू होताच अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या कार्यावर व नेतृत्वावर विश्वास ठेऊन अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रातील विविध पक्षातील असंख्य कार्यकर्ते अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतल्याने, होऊ घातलेली विधानसभेची निवडणूक अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्रात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी एकतर्फी होत असल्याचे एकंदरीत चित्र दिसत आहे.



