भंडाराविदर्भ

साकोलीत मतदार जनजागृतीसाठी ‘वॉक फॉर डेमोक्रसी’

भंडारा : लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हयात 67.4 टक्के मतदान झाले हेाते. या विधानसभा मतदानात जिल्हयात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मोठया प्रमाणावर मतदार जागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे, अश्या या स्वीप कार्यक्रमाचे नोडल अधिकारी शिक्षणाधिकारी रवींद्र सलामे आहेत. त्यांच्या निर्देशात जिल्हयात कमी मतदान असलेल्या ठिकाणी विशेषत भर देवून मतदान जागृती करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून साकोली मतदारसंघात वॉक फॉर डेमोक्रसी अंतर्गत रॅलीचे आयोजन पोलीस स्टेशन पासून नगर परिषद या दरम्यान करण्यात आले.

या रॅलीत एनएसएसचे विदयार्थी, नागरिक, शासकीय अधिकारी मोठया प्रमाणावर सहभागी झाले होते. यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी अश्विनी मांजे, त्यांच्या अंतर्गत सर्व यंत्रणा व अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button