गडचिरोलीविदर्भ

धानोरा-मुंगनेर-पेंढरी रस्त्याची दुरावस्था

माजी आ. डॉ. देवराव होळी यांनी पाहणी करून दिले रस्ता दुरुस्तीचे निर्देश

गडचिरोली : धानोरा-मुंगनेर ते पेंढरी जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली असल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना व वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या मार्गावर जागोजागी खड्डे पडले असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या खड्डेमय रस्त्यामुळे परिसरातील नागरिक अतिशय त्रस्त असून याची दखल घेत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष  माजी आ. डॉ. देवराव होळी यांनी शनिवारी (दि.२६) या रस्त्याची पाहणी केली. या रस्त्याच्या दुरुस्तीसंदर्भात सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून रस्त्याची दुरूस्ती करण्याचे निर्देश दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button