क्राईमचंद्रपूरविदर्भ

लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार; आरोपीला अटक

तीन मुलांची आई असलेल्या महिलेची तक्रार; आरोपी योगेश पोपटे पोलिसांच्या ताब्यात

भद्रावती : लग्नाचे आमिष दाखवून एका ३५ वर्षीय विवाहित महिलेवर गेल्या पाच वर्षांपासून वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना भद्रावती तालुक्यातील एका गावात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने धाडस दाखवून दिलेल्या तक्रारीनंतर भद्रावती पोलिसांनी आरोपीला तातडीने अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला विवाहित असून तिला तीन मुले आहेत. ती काही काळापासून आपल्या माहेरी राहत होती. याच काळात गावातीलच आरोपी योगेश भगवान पोपटे (वय २६) याने या महिलेशी ओळख वाढवली. महिलेचा विश्वास संपादन केल्यानंतर, त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली.

गेल्या पाच वर्षांपासून आरोपीकडून लग्नाचे खोटे आश्वासन देऊन पीडितेचे लैंगिक शोषण केले जात होते. या प्रकारामुळे पीडित महिला प्रचंड मानसिक दडपणाखाली होती. अखेर, सततचा होणारा त्रास सहन न झाल्याने तिने शुक्रवारी भद्रावती पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली आणि आरोपीविरोधात कायदेशीर तक्रार दाखल केली.

महिलेच्या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन भद्रावती पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून आरोपी योगेश पोपटे याला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button