
गडचिरोली : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, पारदर्शक प्रशासनासाठी आणि महिला, नागरिक, युवती, युवक, तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी सतत काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या प्रणोती सागर निंबोरकर यांच्याकडे नगर परिषद अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवावी, अशी जनतेतून एकमुखी मागणी होत आहे.
अलीकडेच भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या प्रणोतीताई यांनी अल्पावधीतच आपल्या प्रभावी कार्यपद्धती, जनसंपर्क आणि सेवाभावामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांपासून ते सर्व गडचिरोली शहरातील नागरिक, महिला, युवक, युवती सर्वांचा विश्वास संपादन केला आहे. त्यांचा पक्षप्रवेश हा गडचिरोली भाजपासाठी नवी ऊर्जा आणि बळ घेऊन आला आहे, असे मत स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.
गडचिरोली शहरातील, महिलांच्या व नागरिकांच्या स्वावलंबनासाठीच्या उपक्रम, तसेच शहरातील विकासकामांमध्ये पारदर्शकता व गती आणण्यासाठी प्रणोती निंबोरकर सातत्याने प्रयत्नशील आहेत. सामाजिक क्षेत्रात दीर्घकाळ कार्य करत असताना त्यांनी अनेक वंचित घटकांना मदतीचा हात दिला असून त्यांच्या प्रत्येक कृतीतून “जनसेवा हीच ईश्वरसेवा” हा भाव दिसून येतो.
शहरातील सर्व स्तरांतील नागरिक, महिला, यूवा वर्ग, युवती, सामाजिक संघटना, व्यापारी संघटना, तसेच कंत्राटदार वर्ग यांनी एकमुखी मत नोंदवले आहे की – “प्रणोती सागर निंबोरकर यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली नगर परिषदेचा विकासाचा नवा अध्याय सुरू होईल. त्यामुळे भाजपाने नगराध्यक्षपदाची संधी या सक्षम, समर्पित आणि जनतेच्या मनात स्थान मिळवलेल्या नेत्या प्रणोती निंबोरकर यांना द्यावी.”
भाजपाच्या ध्येयधोरणांशी निष्ठा ठेवून कार्य करणाऱ्या प्रणोती निंबोरकर यांच्याकडे नगराध्यक्षपदाची सूत्रे गेल्यास गडचिरोली शहरात “सशक्त नेतृत्व, सुशासन आणि सर्वसमावेशक विकास” या त्रिसूत्रीचा नवा युगारंभ होईल, असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.



