क्राईमगडचिरोलीविदर्भ

इतर व्यवसायाच्या आड दारूविक्री करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल ; ३२०० रुपयांची दारू जप्त

मुक्तीपथ आणि पोलिसांची संयुक्त कारवाई

गडचिरोली : शहरातील धानोरा मार्गापासून पोटेगाव मार्गावर इतर व्यवसायाच्या नावाखाली अवैध दारू विक्री करणाऱ्या दोन विक्रेत्यांवर मुक्तीपथ आणि गडचिरोली पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे. या कारवाईत ३ हजार २०० रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली असून, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गडचिरोली शहरातील पोटेगाव रोड बायपास मार्गावर पानठेले, भंगार आणि इतर व्यवसाय आहेत. मात्र, काही व्यक्ती या व्यवसायांच्या आड चोरून देशी दारूची विक्री करतात. सायंकाळच्या आणि सकाळच्या वेळेत या ठिकाणी दारू पिणाऱ्यांची मोठी गर्दी असते. विशेष म्हणजे, या दारू विक्रीच्या ठिकाणांच्या बाजूला शासकीय कार्यालये असल्याने शहरातील नागरिक या अवैध धंद्याला विरोध करत आहेत आणि तो बंद करण्याची मागणी करत आहेत.

यापूर्वीही पोलिसांनी या मार्गावरील अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. अशातच, वॉर्ड संघटनेने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलीस आणि मुक्तीपथच्या पथकाने संयुक्तपणे तीन ठिकाणी धाड टाकली. या कारवाईत ९० मिलीलीटरच्या ४५ निपा, ज्याची अंदाजित किंमत ३ हजार २०० रुपये आहे, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आणि संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई गडचिरोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली धनंजय चौधरी, राजेंद्र पुरी, ऋषाली चव्हाण, डी.बी. पथक आणि मुक्तीपथच्या टीमने यशस्वीपणे पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button