क्राईमगडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

पतीच्या जबर मारहाणीत पत्नीचा मृत्यू

वैरागड येथील घटना ; चिमुकली मुलगी आई-वडिलांना पोरकी

आरमोरी : भांडकुदळ पतीने ऐन दिवाळीच्या पाडव्याला (दि.2) पत्नीसोबत भांडण करून तिला जबर मारहाण केली. यात पत्नीचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील वैरागड येथे घडली. किरण राजू पंडेलगोत (३५) असे मृत महिलेनेचे नाव आहे. तिचा पती राजू परसराम पंडेलगोत (४०) याला पोलिसांनी अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार, सदर पती-पत्नीत नेहमीच भांडण होत होते. यातच काल दिवाळीच्या पाडव्याला दुपारी त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. यावेळी राजू याने पत्नीला जबरदस्त मारहाण केली. यामुळे किरण घरातच कोसळली. त्यानंतर तिला बेशुद्धावस्थेत वैरागडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, पण डॅाक्टरांनी मृत घोषित केले.

आरमोरी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी आरमोरीच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवून आरोपी राजू याला खुनाच्या गुन्ह्यात अटक केली. या दाम्पत्याला अवघ्या 5 वर्षाची मुलगी आहे. आईच्या मायेपासून ती कायमची पोरकी झाली, तर वडील तुरूंगात गेल्याने ती आई-वडीलांच्या छत्राला मुकणार आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button