गडचिरोलीविदर्भ

नृत्य स्पर्धेच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसा टिकतो – आ. कृष्णा गजबे

देसाईगंज : आपल्या झाडीपट्टी भागात नाटक, दंडार, नृत्य स्पर्धा, कार्यक्रमातील मनोरंजनातून प्रेक्षक कलाकारांना भरघोष दाद देत असून अश्या नृत्य स्पर्धांच्या माध्यमातून युवकांना कला क्षेत्रात वाव मिळत असतो. त्यातून मोठा कलावंत निर्माण होत असतो. अश्या कार्यक्रमातून सांस्कृतिक वारसा टिकून राहतो, असे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी केले.

श्री क्षेत्र रखुमाई युवा ग्रुप पारधी मोहल्ला कुरुड यांच्या वतीने दीपावलीच्या शुभपर्वावर नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार कृष्णा गजबे हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटक माजी मुख्याध्यापक हरिभाऊ ढोरे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानीवत मंडळ अधिकारी संतोष पत्रे, डकराम नखाते, आनंदराव नखाते, भाजपा तालुकाध्यक्ष सुनील पारथी, रमेश ठाकरे, महेंद्र देशमुख उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button