गडचिरोलीमुख्य बातमीविदर्भ

आ. डॉ. देवराव होळी यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे

आ. डॉ. होळी यांची भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती ; डॉ. मिलिंद नरोटे यांचा करणार प्रचार

गडचिरोली : अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या गडचिरोली विधानसभा क्षेत्राकरिता विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून बंड पुकारला होता. पण पक्षाच्या वरिष्ठांनी लक्ष घालून डॉ. देवराव होळी यांची यांना समज देऊन आपला नामांकन अर्ज मागे घेण्यासाठी भाग पाडले. विधान परिषदेचे आ. परिणय फुके यांच्या शिष्टाईने ०४ ऑक्टोबर रोजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी आपला अर्ज मागे घेतला. याप्रसंगी  विधानसभा प्रभारी प्रमोद पिपरे व भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे हजर होते.

विद्यमान आमदार डॉ. देवराव होळी हे पक्षातच राहून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांचा प्रचार करणार आहेत व पक्ष विजयासाठी प्रयत्न करणार आहेत.

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी आमदार डॉ. देवराव होळी यांची निवड प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button