भंडाराविदर्भ

८ नोव्हेंबरला आज तकच्या न्यूज अँकर अंजना ओम कश्यप भंडाऱ्यात

राजतिलक कार्यक्रम ; निवडणुकीसंदर्भात जनतेशी करणार चर्चा

भंडारा : आज तक न्यूज चॅनलच्या प्रसिद्ध न्युज अँकर अंजना ओम कश्यप शुक्रवार, ८ नोव्हेंबर ला राजतिलक कार्यक्रमासाठी भंडाऱ्यात येत आहेत. त्यांच्या समवेत राजदीप सरदेसाई हे सुद्धा येणार असल्याची माहिती आज तक न्यूज चॅनलचे भंडारा जिल्हा प्रतिनिधी व्यंकटेश दुडमवार यांनी दिली आहे.

अंजना ओम कश्यप ह्या हेलिकॉप्टरने १० वाजता भंडारात दाखल होणार आहेत. आज तक न्यूज चॅनलच्या वतीने राजतिलक कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमात महसूल कॅन्टीन, भंडारा, खामतलाव चौक, गांधी चौक, भंडारा, शास्त्री चौक, भंडारा येथे येणाऱ्या गडचिरोली विधानसभा निवडणूकसंदर्भात जनतेच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button