गडचिरोलीगोंदियामुख्य बातमीविदर्भ

विकासासाठी भाजपा महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांना निवडून द्या – आ. तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांचे आवाहन

आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रात भाजपा महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांच्या प्रचारार्थ कहाली, निंबा व रोंढा येथे कॉर्नर सभा

सालेकसा : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशान्वये आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रातील सालेकसा तालुक्यातील कहाली, निंबा व रोंढा येथे कॉर्नर सभा घेण्यात आली. भाजपा महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांच्या प्रचारार्थ विधानसभा क्षेत्रात मतदार सोबत जनसंवाद करून विकासासाठी माजी आ. संजय पुराम यांना निवडून देण्याचे आवाहन आमदार तथा भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांनी केले.

याप्रसंगी तालुकाध्यक्ष गुमानसिंह उपराडे, तालुका महामंत्री रवी हत्तीमारे, राजेंद्र बडोले, शालिनी बडोले, पंकज पनपालिया, प्रतीक राठी, सुरेखा साखरे, महेश साखरे, युवराज सांगोळे तसेच मतदार बंधू-भगिनी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button