
सालेकसा : आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्रातील तिरखीळी, तिरखीळी टोला, गिरोला, सोनार टोला व इसना टोला येथे कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी भाजपा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार संजय पुराम यांच्या कमळ चिन्हा समोरील बटण दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी केले.
याप्रसंगी माजी जि.प. सदस्या तथा भाजपा जिल्हा सचिव कल्याणी कटरे, गिरोला सरपंच रविता मेंढे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष मधु अग्रवाल, सरपंच संजू कटरे, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तुरकार, सामाजिक कार्यकर्ते संतोष चंद्रीकापुरे तथा मतदार बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



