गडचिरोलीविदर्भ

माजी खा. अशोक नेते यांच्या उपस्थितीत धान्य व्यापाऱ्यांची बैठक

अडीअडचणींसह विविध मुद्द्यांवर चर्चा

गडचिरोली : शिवणी येथील लक्ष्मी राईस मिल येथे धान्य व्यापार्‍यांची बैठक माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्या मार्गदर्शनात झाली. या बैठकीत व्यापाऱ्यांनी त्यांना येणाऱ्या अडचणींसह विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली.

जिल्हा संघचालक घिसुलालजी काबरा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत धान्य व्यापारी रमेश सारडा, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रमेश भुरसे, नंदू काबरा, प्रवासी कार्यकर्ता विनिता कुलस्ते, प्रकाश निकुरे तसेच मोठ्या संख्येने व्यापारी सहभागी झाले होते.

या बैठकीत व्यापाऱ्यांच्या समस्या, व्यापार धोरणे आणि नवीन नियमांवर सखोल चर्चा झाली. व्यापार्‍यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि व्यवसायवृद्धी करण्यासाठी काही उपाययोजना व धोरणात्मक निर्णय घेण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button