
तुमसर : निवडणूकीच्या दरम्यान आपली दिशाभूल करण्यासाठी विरोधक येणार आहे, लोकसभेच्या पार्श्वभूमीवर संविधानाला धोका आहे असा फेक नरेटीव निर्माण करण्यात आला होता, पण मी खात्री पूर्वक सांगतो कि, विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेला संविधान कोणीही बदलु शकणार नाही किंबहुना बदलु देणार नाही. विरोधकांकडे विरोधा शिवाय काही नाही, या क्षेत्राचा विकासाच्या दृष्टीतून चेहरा मोहरा बढलविण्याचे काम आम्हीच करणार आहो, म्हणुन क्षेत्राचा सुजलाम-सुफलाम करण्यासाठी महायुतीचे उमेदवार राजु कारेमोरे यांना विजयी करा असे आवाहन खा. प्रफुल पटेल यांनी केले.
तुमसर विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार राजू कारेमोरे यांच्या प्रचारार्थ श्री हनुमान मंदिर चौक, लोहारा या ठिकाणी आयोजीत सभेला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी मंचावर देवचंद ठाकरे, अभिषेक कारेमोरे, राजेश देशमुख, अरविंद कारेमोरे, दिनकर मोहतुरे, धर्मपाल धुर्वे, गुलाब पिल्ल्हारे, सूर्यभान माकडे, दीपक घोडीचोर, विजय भुरे, आशिष बनोठे महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



