वर्धाविदर्भ

पत्नीशी मोबाईलवर वाद ; पतीने घेतला गळफास

देवळी येथील जिनिंग परिसरातील घटना

वर्धा : मोबाइलवर बोलताना पत्नीशी झालेल्या वादामुळे संतापलेल्या पतीने जिनिंगच्या मागील परिसरात असलेल्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली. याप्रकरणी देवळी पोलिसात २३ रोजी तक्रार दिली.

बबनसिंग बालमेकी सिंग (रा. बुद्धम मरहर टोला जि. मुगेर राज्य बिहार) असे मृतकाचे नाव आहे. बबनसिंग हा हमाली काम करण्यासाठी देवळी येथे आला होता. तो जय बजरंग जिनिंगमध्ये हमाली काम करत होता. त्याने जिनिंगच्या बाहेर येत पत्नीशी मोबाइलवरून संवाद साधला. दरम्यान दोघांत शाब्दिक वाद झाला. त्यानंतर काही वेळाने बबनसिंगचा भाऊ टुनूसिंग याच्या मोबाइलवर बबनसिंगच्या पत्नीचा फोन आला आणि बबनसिंग याने मी आत्महत्या करण्यासाठी जात आहे, असे फोनवर सांगितल्याचे सांगितले. दरम्यान धर्मदास कुमार मंडल व टुनूसिंग या दोघांनी बबनसिंगचा शोध घेतला असता बबनसिंग याने जिनिंगच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेतील एक लोखंडी खांबाला गठाणी बांधण्याच्या पट्टीने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याला कारमध्ये टाकत खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. याप्रकरणी देवळी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button