
भंडारा-तुमसर मार्गावरील घटना ; सुदैवाने कुठलीही प्राणहानी नाही
खापा : भंडारा-तुमसर मार्गावरील खापा येथील विहिरगाव फाट्याजवळ भंडाऱ्याहून तुमसरकडे येत असलेली चारचाकी क्रमांक एमएच ३६ एच- २४९२ कारचे नियंत्रण सुटल्याने झाडावर जाऊन आदळली. हे वाहन तुमसर पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी कुरेशी यांचे असून ते स्वतः चालवित होते. यात सुदैवाने कुठलीही प्राणहानी झाली नाही. मात्र ते व अन्य एक महिला जखमी झाली. ही घटना सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.
माहितीनुसार, आरोग्य अधिकारी कुरैशी हे आपल्या कारने तुमसरकडे येत होते. वाहन वेगात असल्याने विहीरगाव फाट्याजवळ त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यात वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. यावेळी वाहनात डॉक्टरांसह त्यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.



