गडचिरोलीविदर्भ

वसा-पोर्ला वनपरिक्षेत्रात हत्तींचा वावर ; माजी खा. अशोक नेते यांची पाहणी व तातडीने निर्देश

गडचिरोली : गडचिरोलीपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या वसा-पोर्ला या वनपरिक्षेत्रात मागील दोन दिवसांपासून हत्तींचा कळप वावरत आहे. या घटनेमुळे गावकरी भयभीत झाले आहेत. संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांनी वसा येथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून गावकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी योग्य ती खबरदारी घेण्याची सूचना त्यांना केली. तसेच गावकऱ्यांना धीर देत न घाबरता एकजुटीने राहण्याचे आवाहन केले.

या पाहणीवेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, भाजप नेते लोमेश कोलते, वडसाचे उपवनसंरक्षक बी.आर. वरुण, पोर्लाचे वनक्षेत्र सहाय्यक जी.एस. गेडाम, वनरक्षक व्ही.टी. शिवनकर, किटाळीचे वनक्षक एन.व्ही. भोयर, साखराचे वनरक्षक धर्मपाल मेश्राम यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी आणि भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

हत्तींच्या बंदोबस्तासाठी विशेष टीम दाखल

हत्तींचा वावर नियंत्रित करण्यासाठी आणि त्यांना सुरक्षितरीत्या परिसराबाहेर नेण्यासाठी पश्चिम बंगालमधून श्याम तुंडू यांच्या नेतृत्वाखाली 11 जणांची विशेष टीम बोलवण्यात आली आहे. हत्तींच्या वावरामुळे गावकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी व त्यांचे संरक्षण करण्यासाठी वनविभाग सक्रिय झाला आहे. वनविभागाच्या या कारवाईमुळे गावकऱ्यांना दिलासा मिळाला असून. प्रशासनाकडून दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लवकरच परिस्थिती सामान्य होईल, असा विश्वास माजी खासदार अशोक नेते यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button