
चंद्रपूर : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता हरीश गजबे यांचे हस्ते 26 नोव्हेंबर ला भारताचे संविधान स्तंभाचे महावितरण विद्युत भवन परिसरात उद्घाटन करण्यात आले व भारतीय संविधानाचे वाचन करण्यात आले. तसेच अधीक्षक अभियंता श्रीमती संध्या चिवंडे यांच्यातर्फे संविधान पुस्तिकेचे वितरण करण्यात आले.
यावेळी मुख्य अभियंता हरीश गजबे, अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे, अधीक्षक अभियंता रमेश सानप (पा.आ.) यांनी भारतीय संविधानाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी कार्यकारी अभियंता रवींद्र वांदिले (प्रशासन), चंद्रशेखर दारव्हेकर, सत्यदेव पेगलपट्टी, विकास शहाडे (प्रशासन), शीतलकुमार घुमे (स्थापत्य), सहा. महाव्यवस्थापक (मा.सं.) प्रभारी सुशील विखार, वरिष्ठ व्यवस्थापक (विवले) राकेश बोरिवार, उपविधी अधिकारी शैलेंद्र फुले, व सर्व अधिकारी/कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



