क्राईमगोंदियाविदर्भ

भावाच्या खुनाच्या बदल्यात खून ; दोघांना अटक

तिरोडा तालुक्यातील भिवापूर येथील घटना

गोंदिया : तिरोडा तालुक्यातील ग्राम भिवापूर येथे रविवारी (दि. २४) सकाळी ९:३० वाजता रक्ताच्या थारोळ्यात सुनील चंद्रकुमार तुमडे (३२, रा. भुराटोला) याचा मृतदेह आढळला होता. या खून प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली. वैष्णवी गणेश सुरणकर (१९, रा. भिवापूर) व मंगेश माणिकचंद रहांगडाले (२४, रा. भुराटोला) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

रविवारी (दि.२४) सकाळी भिवापूर येथील नाल्याजवळ सुनील तुमडे याचा मृतदेह आढळला होता. धारदार हत्याराने डोक्यावर वार करून त्याचा खून करण्यात आला होता. सुनीलची आई चंद्रकला तुमडे यांच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल केला. पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी प्रकरणाचा उलगडा करण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते. या प्रकरणाचा उलगडा करून वैष्णवी सुरणकर व मंगेश रहांगडाले यांना अटक केली. दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांना शनिवारपर्यंत (दि.३०) पोलिस कोठडी सुनावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button