चंद्रपूरविदर्भ

स्वीप उपक्रमांतर्गत सेल्फी व विविध स्पर्धा ; शंकर भर्रेने जिंकली बुलेट

सिंदेवाहीच्या सोनल व चिमुरचे गीतेश यांनाही पुरस्कार

चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वीप उपक्रमांतर्गत सेल्फी व विविध स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत ब्रह्मपुरी तालुक्यातील शंकर भर्रे हे बुलेट दुचाकीचे मानकरी ठरले, याशिवाय सिंदेवाहीच्या सोनल व चिमूरचे गीतेश यांनाही पुरस्कार जाहीर झाला आहे.

मतदान केल्यानंतर सेल्फी अपलोड करण्याच्या स्पर्धेत ८ हजार ८० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. लकी ड्रॉद्वारे या स्पर्धेचा निकाल जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि.२७) घोषित करण्यात आला.

प्रथम क्रमांकाचे बक्षीस (बुलेट मोटारसायकल) ब्रह्मपुरी तालुक्यातील  शंकर भर्रे यांना, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस (१५ ग्रॅम सोन्याचे नाणे) सिंदेवाही तालुक्यातील सोनल श्यामराव गभने व तृतीय क्रमांकाचे बक्षीस (मोबाईल फोन) चिमूर तालुक्यातील गीतेश मदनकर यांना घोषित करण्यात आले. जिल्ह्यातील मतदारांमध्ये मतदानाप्रति जनजागृती होऊन मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वीप उपक्रमांतर्गत सायकल रॅली, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा, टॅगलाइन, रील्स तयार करणे, सेल्फी अपलोड करणे इ. स्पर्धा आयोजित केल्या होत्या.

विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत सर्व स्तरावर नाविण्यपूर्ण उपक्रमाद्वारे विविध उपक्रम राबिवण्यात आले. त्यासाठी अनेक स्पर्धाही घेण्यात आल्या. निबंध, वक्तृत्व व रांगोळी स्पर्धा ते सायकल रॅलीपासून तर विविध स्पर्धा झाल्या. त्या स्पर्धेत नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. शिवाय यंदा मतदानाचा टक्काही वाढला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button