
चामोर्शी : वैनगंगा नदीला पूर आल्याने अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली आल्या. पीक सडले. शनिवारी खा. डॉ. नामदेव किरसान यांनी पुरपरिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी तहसीलदारांना नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे निर्देश दिले.
आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क राहून पुलावरून पाणी वाहत असलेल्या पुलावर अनुचित घटना घडू नये, याची काळजी घ्यावी, असे निर्देश खा. डॉ. किरसान यांनी तहसीलदार यांना दिले. घारगाव, दोटकुली, खंडाळा, वाघोली, वेलतुर तुकूम, भेंडाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे त्यांनी भेट दिली. मार्कंडादेव येथील मंदिर बांधकामाचा अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. ग्रामिण रुग्णालयात अधिकारी यांचेसोबत चर्चा केली. स्थानिक विश्रामगृहात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.
यावेळी प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अॅड. विश्वजीत कोवासे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, डॉ. सोनल कोवे, काँग्रेसचे नेते राजेश ठाकूर, तालुका काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, उपनगराध्यक्ष लोमेश बुरांडे, बांधकाम सभापती वैभव भिवापुरे, सतिश विधाते, मनोहर पाटील पोरेटी, डॉ. रविंद्र सुरपाम, काँग्रेसचे युवानेते गुरुदेव सातपुते, दिलीप वनकर, दिगंबर धानोरकर, रुपेश टिकले, जितेंद्र मुनघाटे, चारूदत्त पोहाणे, निकेश गद्देवार, संजय वडेट्टीवार, निलकंठ निखाडे, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेतकरी उपस्थित होते.



