
४१ जणांवर गुन्हा दाखल
भंडारा : धुळवडदिनी भंडारा, कारधा, जवाहरनगर, वरठी, करडी, तुमसर, आंधळगाव, सिहोरा, गोबरवाही, साकोली, पवनी, अड्याळ व लाखांदूर पोलिस ठाणे हद्दीत दारू अड्डयावर जिल्हा पोलिसांनी धाडी घातल्या. यात एकूण ११ लाख ५७ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी भंडारा पोलिसांनी शैलेश ब्रह्मपूरकर (४५, रजनीनगर, भंडारा), जोगेंद्र आंबेडारे (२७, डोडमाझरी), अभिमन्यू उके (४०, आंबेडकर वॉर्ड, ठाणा पेट्रोल पंप), सत्यजित लेंडे (३०, खुर्शीपार), रेखा गणवीर (५०, मुजबी), श्रीकांत नन्नेवार (३१, अंबिकानगर, भोजापूर), कुसुम खंडरे (५३, मेंढा, भंडारा), कारधा पोलिसांनी पोलिसांनी अर्जुन बाभरे (३०, सालेबर्डी), प्रीतम हुमणे, हुमणे (३७, डोडमाझरी टेकेपार), रयनाबाई ठाकरे (६०, कारधा), दुधराम भुरे (५५, मकरधोकडा), सुलक्षणा मडामे (४९, करचखेडा नवीन), राजकुमार उके (४२, गिरोला) शैलेश मानकर (३९, दवडीपार बाजार), आसिक खंगार (३१, तिड्डी), उत्तम मेश्राम (४२, आमगाव), जवाहरनगर पोलिसांनी शशिकांत वाघमारे (२८, साहुली), वरठी – अनिकेत गजभिये (२४, पाचगाव), मधु निर्वाण (६०, वरठी), भगवान सिंदपुरे (५८, दाभा), श्रीराम हटवार (४६, सातोना), करडी ज्योती वावधने (४६, देव्हाडा, बु.), तुमसर पोलिसांनी लक्ष्मण कुंभले (३९, मेहगाव), रामदयाल वघारे (५८, पचारा), दिनेश शहारे (३४, साखळी), विकास पारधी (४०, मेहेगाव), आंधळगाव गणेश निमजे (६५, आंधळगाव), प्रदीप भोयर (३९, वडेगाव) सिहोरा पोलिसांनी प्रभा दांडेकर (७०, सोनेगाव), गोबरवाही पोलिसांनी आत्माराम नेवारे (५८, आष्टी), मुनेश्वर उईके (३९, कुरमुडा), साकोली – पंकज मडामे (४८, बांपेवाडा), श्रीराम उपरीकर (६०, पळसगाव) मल्लेश बैय्यारवार (४९, परसोडी), पवनी महेश मांडवकर (४२, पवनी), विनोद बावनकर (४८, पवनी), चिंतामण पाटील (४८, वायगाव), विजय नेवारे (३०, सिरसाळा), रेखा मेश्राम (५५, वलनी), अड्याळ मोहन गोडसेलवार (४२, अड्याळ), अक्षय गजभिये (३१, केसलवाडा) यांच्या विरोधात गुन्हे नोंदविले आहे.



