
चंद्रपूर : सावली तालुक्यातील पारडी येथे ५ डिसेंबर ला जिल्हा परिषद शाळेतील ११४ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. सर्व बाधित विद्यार्थ्यांना महिला रुग्णालय गडचिरोली येथे भरती करण्यात आले. माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी विद्यार्थ्यांना भेट देत तब्येतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी डॉक्टरांकडून संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला.
सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून सर्वांच्या प्रकृतीत सुधार होत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच भाजपचे नेते अविनाश पाल उपस्थित होते.



