गडचिरोलीविदर्भ

बोटेकसातील भगवंतराव हायस्कुल जिल्ह्यात सर्वात सुंदर शाळा

मुख्यमंत्री माझी सुंदर शाळेचा प्रथम क्रमांक ; सीईओंच्या हस्ते सन्मान

कोरची : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात जिल्ह्यातील सर्वच शाळांनी सहभाग घेतला होता. मात्र, कोरची तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या बोटेकसा येथील भगवंतराव हायस्कूलने जिल्ह्यात सर्वात सुंदर शाळा असल्याचा मान पटकावून जिल्हास्तरावर खासगी संस्था गटातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.

गुरुवारला जिल्हा परिषदेच्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात आयोजित सोहळ्यात मुख्य कार्यपालन अधिकारी सुहास गाडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे, प्राथमिक शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन या शाळेला सन्मानित करण्यात आले. यावेळी मंचावर प्राथमिक उपशिक्षणाधिकारी विवेक नाकाडे, डाएटचे अधिव्याख्याता पुनित मातकर उपस्थित होते.

पुरस्कारातून मिळालेल्या रकमेचा विनियोग सदर शाळेच्या विकास व गुणवत्तेसाठी करण्यात येणार आहे. यावेळी वनवैभव शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष बबलू हकीम, सदस्य प्राचार्य लीना पठाण, सदस्य छोटू हकीम, अबूझमाड शिक्षण मंडळाचे सचिव तथा बोटेकसा शाळेचे मुख्याध्यापक शमशेरखान पठाण यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

प्रशस्तिपत्रक आणि एकूण अकरा लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सर्व उपस्थितांनी भगवंतराव हायस्कूलचे प्राचार्य, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी आणि संचालक मंडळाचे व शाळा व्यवस्थापन समितीचे कौतुक केले. शाळांमधील भौतिक सुविधा, क्रीडांगण, विद्यार्थी गुणवत्ता, ग्रंथालय, शिक्षक, कर्मचारी, विविध उपक्रम, लोकसहभाग या सर्व बाबींचे मूल्यांकन करून सदर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button