गडचिरोलीविदर्भ

लोहखनिज घेऊन जाणारा ट्रक उलटला

सुदैवाने ट्रकचालक थोडक्यात बचावला

कोरची : सुरजागडवरून लोह खनिज घेऊन निघालेला ट्रक बेडगाव पुढील एका वळणावर शुक्रवारच्या मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास शेतातील बांधात उलटला. या अपघातात सुदैवाने ट्रकचालक थोडक्यात वाचला आहे.

कोरचीपासून तीन किलोमीटर अंतरावर येत असलेल्या बेडगावजवळच्या एका वळणावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने रात्री साईड न दिल्यामुळे लोह खनिज घेऊन जाणारा ट्रक (सीजी ०९ जेपी ९३८१) बांधात जाऊन उलटला. पोलिसांनी १४ रोजी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. या भागातून लोह खनिज घेऊन जाणाऱ्या वाहनांची रेलचेल मोठी आहे. सततच्या अपघातामुळे रस्ता सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button