गडचिरोलीविदर्भ

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी दिली अतिसंवेदनशील पोमकें पेनगुंडा व उपपोस्टे लाहेरी येथे भेट 

गडचिरोली : महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांनी १७ डिसेंबर रोजी गडचिरोली पोलीस दलास भेट दिली. यावेळी पोलीस महासंचालक यांनी ११ डिसेंबर रोजी उपविभाग भामरागड अंतर्गत नव्याने स्थापन झालेल्या अति-संवेदनशिल पोमकें पेनगुंडा येथे भेट देऊन पोमकें पेनगुंडा येथील कामकाजाची पाहणी केली व उपस्थित अधिकारी व अंमलदार यांच्याशी संवाद साधला.

त्यानंतर पोलीस महासंचालक यांनी पोमकें पेनगुंडा येथील परिसरातील माआवोदविरोधी अभियानाबाबतचा आढावा घेत सर्व जवानांच्या राहण्याच्या व्यवस्थेची पाहणी केली. यासोबतच पोलीस महासंचालक यांचे हस्ते व अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) संजय सक्सेना, आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, म.रा. मुंबई शिरीष जैन, विशेष पोलीस महानिरीक्षक, नक्षलविरोधी अभियान नागपूर संदिप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन आयोजित केलेल्या महाजनजागरण मेळाव्यात हजर नागरिकांना स्प्रे पंप, स्वयंपाकासाठी लागणारी मोठी भांडी, वाजंत्री साहित्य, शिलाई मशिन, ब्लॅकेट, लोवर-टीशर्ट, धोतर, घमेले, महिलांना साड्या व चप्पल, तसेच शालेय विद्यार्थ्यांना सायकल, पेन, नोटबुक, स्कुल बॅग, क्रिकेट किट, व्हॉलीबॉल व नेट, कपडे, कंपॉस, चॉकलेट, बिस्कीट इ. साहित्यांचे वाटप करण्यात आले.

सदर मेळाव्यात अतिदुर्गम पोमकें पेनगुंडा हद्दीतील १००० हून अधिक नागरीक उपस्थित होते. यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधतांना पोलीस महासंचालक यांनी सांगितले की, या नवीन पोलीस मदत केंद्राच्या माध्यमातून गडचिरोली पोलीस दलातर्फे आपल्या सर्व समस्या सोडविण्याचा प्रयत्न केल्या जाईल व गडचिरोली पोलीस दल राबवित असलेल्या विविध योजनांचा येथील जास्तीत जास्त नागरिकांनी फायदा घ्यावा. तसेच छत्तीसगड सिमेपासून अगदी जवळ महाराष्ट्र राज्याच्या अगदी शेवटी असलेल्या पेनगुंडा हा भाग अतीदुर्गम जरी असला तरी, भविष्यात काही दिवसांमध्ये येथे रस्ते, आरोग्यसेवा इ. सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. तसेच या अतिसंवेदनशिल भागामध्ये सर्व अधिकारी व जवानांनी येथील नागरिकांसोबत एकजुटीने राहून आपले कर्तव्य पार पाडावे व येत्या काळात आम्ही माओवाद संपवून गडचिरोली जिल्ह्याचा विकास करु असे सांगितले. तसेच नवनिर्मित अति-संवेदनशिल पोमकें पेनगुंडा येथे उपस्थित असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमर मोहिते व प्राणहिता सी- ६० चे पोअं/३७९८ श्रीराम सोरी यांचा वाढदिवस असल्याने पोलीस महासंचालक यांनी त्यांचे सोबत केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला व उपस्थित अधिकारी/अंमलदार यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यासोबतच जवानांचे मनोबल उंचाविण्याकरीता आणि पेनगुंडा येथे बडाखाण्याचे आयोजन करण्याकरीता पोलीस महासंचालक यांनी एक लाख रुपयांचे बक्षिस दिले व त्यानंतर पेनगुंडा हद्दीतील उपस्थित नागरिकांसोबत राष्ट्रगित घेऊन कार्यक्रम संपन्न झाला.

त्यानंतर पोलीस महासंचालक यांनी उपपोस्टे लाहेरी येथील परिसरातील माआवोदविरोधी अभियानाबाबतचा आढावा घेत सर्व पोलीस अधिकारी/अंमलदार यांची वृंद परिषद घेऊन उपस्थित सर्व अधिकारी/अंमलदार यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या व जवानांसोबत जेवनाचा आस्वाद घेतला.

दिवसभर चाललेल्या या सर्व कायक्रमांमध्ये अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) म.रा. मुंबई संजय सक्सेना, आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, म.रा. मुंबई शिरीष जैन, विशेष पोलीस महानिरीक्षक, नक्षलविरोधी अभियान नागपूर, संदिप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, कमाडेण्ट ११३ बटा सिआरपीएफ जसवीर सिंग, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक, अहेरी श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड अमर मोहिते व उपविभागीय पोलीस अधिकारी अहेरी अजय कोकाटे हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button