गडचिरोलीविदर्भ

गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

निकतवाडा येथील घटना 

चामोर्शी : तालुक्यातील घोट येथून जवळच असलेल्या निकतवाडा येथे गळफास घेऊन एका तरुणाने आत्महत्या केली. ही घटना १६ डिसेंबरला घडली.

मुन्ना बाजीराव मडावी (३७, रा. निकतवाडा) असे मयताचे नाव आहे. मुन्ना मडावी यांच्या वडिलांच्या नावे दोन एकर शेती आहे. त्यांनी त्यावर पीक कर्ज घेतले होते. वडील आजारी आहेत. शेतात यंदा पीकव्यवस्थित न आल्याने कर्ज कसे फेडायचे, या विवंचनेत ते होते, असे कुटुंबीयांनी सांगितले. त्यांची पत्नी माहेरी गेली होती. अशातच १६ रोजी सकाळी घरी कोणी नसताना त्यांनी सिलींग पंख्याला दोरीने गळफास घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. घोट पोलिस मदत केंद्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक नीतेश गोहणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिलीप सिडाम करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button