
गडचिरोली : संविधानीक पदावर असलेल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेकर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याविरोधात शनिवार, २१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता येथिल इंदिरा गांधी चौकात वंचित बहुजन आघाडी, तमाम आंबेडकरी तसेच समविचारी पक्ष व सामाजीक संघटनेच्या वतिने तिव्र निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे.
गृहमंत्री शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भाने फॅशन म्हणून आंबेेडकर, आंबेडकर असे घेण्यापेक्षा देवाचे नाव घेतले तर सात जन्म स्वर्गात जागा मिळेल, असे मनुवादी वक्तव्य केल्याने तमाम जगभरातील व देशातील डॉ. आंबेडकरांना मानणाऱ्या अनुयायांच्या भावना दु:खावल्यामूळे तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
देशाचे गृहमंत्री शहा हे जोपर्यंत आपल्या संविधानीक पदाचे राजीनामा देत नाही तोपर्यंत देशभरात तिव्र आंदोलने होणार आहेत. अशा बेजबाबदार गृह मंत्र्याला संविधानीक पदावर राहण्याचा अधिकार नाही. म्हणून वंचित बहुजन आघाडी, समविचारी पक्ष व सामाजीक संघटनेच्या वतिने गडचिरोली येथे इंदिरा गांधी चौकात तिव्र निदर्शने आंदोलन करण्यात येत असून संविधानाला मानणाऱ्या तमाम आंबेडकरी पक्ष व सामाजीक संघटनांनी तसेच वंचित बहुजन आघाडीच्या सर्व विंगचे सर्व जिल्हा, तालुका, शहर वंचित, वंचित बहुजन महिला आघाडी, वंचित बहुजन युवक आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, वंचित कामगार संघटनेच्या सर्व पदाधिका-यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन बाळू टेम्भूर्णे यांनी केले आहे.



