गडचिरोलीविदर्भ

बबलू हकीम यांच्या हस्ते नवेगाव (वे) येथील हनुमान मंदिराचे लोकार्पण

शाहीन हकीम, छोटू हकीम यांची विशेष उपस्थिती

३५ वर्षांपासून जीर्णावस्थेत होते मंदिर ; बबलू हकीम यांनी केली आर्थिक मदत

अहेरी : तालुक्यातील नवेगाव (वे) येथे हनुमान जयंतीच्या शुभ मुहूर्तावर ३५ वर्षापूर्वीच्या हनुमान मंदिराच्या नवीन बांधकामाचे लोकार्पण अहेरी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते कार्यक्रमाचे बबलू हकीम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाहीन हकीम, छोटू हकीम, गावातील प्रमुख नागरिक तुकाराम झोडे, वासुदेव गाऊत्रे, राऊजी शेंडे, शिवराम मोहुर्ले, रामचंद्र आदे, नागोराव सोनुले, पत्रुजी शेंडे, चंदू बोरुले, साईनाथ नागोसे, मुख्याध्यापक गजानन लोणबले, प्राचार्य विठ्ठल निखुले उपस्थित होते.

गावकऱ्यांनीबबलू हकीम, शाहीन हकीम आणि छोटू हकीम यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. मंदिराच्या बांधकामात योगदान देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना, गाव पाटलांना आणि कारागिरांना साडीचोळी, शाल व श्रीफळ देऊन गौरवण्यात आले.

उपसरपंच उमेश मोहुर्ले यांनी प्रास्ताविकात मंदिराच्या इतिहासाचा मागोवा घेत बबलू हकीम यांच्या योगदानाला सलाम ठोकला. “ज्याप्रमाणे प्रभू श्रीराम, सीता माता आणिलक्ष्मण गावात आले, तसेच बबलू भैय्या, शाहीन भाभी आणि छोटू भैया आज आमच्या गावात अवतरले,” असे त्यांनी भावपूर्ण उद्‌गार काढले.

बबलू हकीम यांनी आपल्या ओजस्वी भाषणात मंदिराला आस्थेचे आणि एकतेचे प्रतीक संबोधले. “गावचा मुलगा म्हणून मी हीमदत केली. यापुढेही ईश्वरीय कार्यासाठी मी सदैव तत्पर आहे. गावातील तरुणांनी शिक्षण घेऊन माळी समाजाचे नाव जगात उंचावावे,” असे आवाहन केले. छोटू हकीम यांनी सर्व धर्माचा आदर व्यक्त करत गावाच्या एकजुटीची ताकद अधोरेखित केली. “एकत्र आलो की कोणतीही अडचण मोठी राहत नाही,” असे त्यांनी ठासून सांगितले.

मंदिर बांधकाम समितीचे गजानन मोहुर्ले, विश्वनाथ गुरनुले, उमेश मोहुर्ले, यादव झोडे, शरद गाऊत्रे यांच्यासह सर्व सदस्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली. सूत्रसंचलन संजय गुरनुले यांनी तर आभार प्रदर्शन रेघे यांनी केले. नवेगाव आणि परिसरातील महिला, तरुण, ज्येष्ठ नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा सोहळा अविस्मरणीय बनवला. नवेगावने या मंदिराच्या पुनर्जननातून आपले सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव पुन्हा एकदा सिद्ध केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button