चंद्रपूरदेश -विदेशमुख्य बातमीविदर्भ

दिल्लीत ताडोबातील वाघांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन

नवी दिल्ली : अवघ्या २० वर्षाच्या वाइल्डलाईफ फोटोग्राफर एकम यांनी वन्य प्राण्यांच्या टिपलेल्या फोटोंची प्रदर्शनी येथे बिकानेर हाऊस येथील आर्ट गॅलरीत भरविली आहे. राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रदर्शनीला भेट दिली आहे.

एकम यांनी स्कॉटलँड येथे कायद्याचे शिक्षण घेत आहेत. मात्र, त्यांना वाइल्डलाईफप्रती कमालीचे आकर्षण आहे. ताडोबातील वाघोबांसह चिमण्या, घुबड, मोर, बंदर अशा दहा वन्य प्राण्याचे दैनंदिन जीवन उलगडणारे २६३ फोटो या प्रदर्शनीत लावण्यात आले आहेत.

याशिवाय राजस्थानच्या रणथंभोर, झलाना आणि भरतपूर, उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट, राजाजी नॅशनल पार्क येथील फोटोंचा समावेशही प्रदर्शनीत आहे. ऐकम वयाच्या आठव्या वर्षापासून वन्यजीवाची फोटोग्राफी करीत आहे. आपल्या अवती-भोवती वन्यजीव आहेत आणि त्यांचे संरक्षण करणे माणसाचे कर्तव्य आहे असे समजून त्या तरुण पिढीला भारतीय वन्यजीवांच्या सौंदर्याची ओळख करून देण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button