क्राईमगडचिरोलीविदर्भ

सांबराची शिकार ; तीन आरोपींना अटक

पश्चिम पावीमुरांडा जंगल परिसरातील घटना ; आरोपींना १३ दिवसांची न्यायालयीन कोठडी 

चामोर्शी : वनपरिक्षेत्र कार्यालय कुनघाडा रै. अंतर्गत येणाऱ्या उपक्षेत्र पश्चिम पावीमुरांडा जंगल परिसरात सांबर वन्य प्राण्याची शिकार केल्याप्रकरणी तीन आरोपींना वनविभागाच्या पथकाने अटक केली.

सुनील सावजी कांदो, जीवन टेमू मठ्ठामी, बापू सोनू गावडे सर्व रा पांढरी भटाळ अशी आरोपींची नावे आहेत. गुप्त माहितीच्या आधारे वनपरिक्षेत्र कार्यालय कुनघाडा रै अंतर्गत पावीमुरांडा उपक्षेत्रात २३ डिसेंबरच्या रात्री १२:३० च्या सुमारास आरोपी सुनील सावजी कांदो (रा. पांढरी भटाळ) यांच्या घराची पाहणी केली असता घरात वन्य प्राण्याचे मांस आढळून आले. मांस ताब्यात घेऊन पंचासमक्ष जप्तीनामा व पंचनामा नोंदविण्यात आला.

आरोपीस वनपरिक्षेत्र कार्यालयात हजर करून कबुली जबाब नोंदविण्यात आला. आरोपीच्या सांगण्यावरून जीवन टेमू मठ्ठामी व बापू सोनू गावडे (रा. पांढरी भटाळ) यांनीही गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांच्या विरुध्द वनगुन्हा नोंदविण्यात आला. या कारवाईने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.

तिन्ही आरोपींना २४ डिसेंबर रोजी तीन दिवसांची वनकोठडी सुनावली होती. त्यानंतर २७ रोजी पुन्हा न्यायालयात हजर केले असता, १३ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. शिकारीसाठी वापरण्यात आलेली हत्यारे व हाडे-मांस जप्त करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button