गडचिरोलीविदर्भ

‘मनोन्याय’ कक्षाचे सदस्यांकरीता दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

गडचिरोली : सप्टेंबर २०२४ मध्ये राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी मानसिक आजारी असलेल्या व्यक्ती आणि बौद्धिक विकलांग व्यक्तींकरीता कायदेविषयक सेवा योजना, २०२४ जाहीर केली. त्याअंतर्गत १३ पॅनल अधिवक्ता व २४ विधी स्वयंसेवक यांचा समावेश असलेले पथक सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केले आहे. त्या पथकातील सदस्यांकरीता महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीतर्फे ०६ जानेवारी व ०७ जानेवारी रोजी ‘कॉन्फरन्स हॉल’, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली येथे दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वसंत भा. कुलकर्णी यांच्या हस्ते व अधिवक्ता संघाचे अध्यक्ष किशोर आखाडे यांच्या उपस्थितीमध्ये ०६ जानेवारी रोजी पार पडले.

दोन दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये पहिल्या दिवशी प्रथम सत्रामध्ये मा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव आर. आर. पाटील यांनी मानसिक आजारी असलेल्या व्यक्ती आणि बौद्धिक विकलांग व्यक्तींकरीता कायदेशिर सेवांची तरतूद व मानसिक आजारी असलेल्या व्यक्ती आणि बौद्धिक विकलांग व्यक्तींकरीता कायदेविषयक सेवा योजना, २०२४ या योजनेबाबत मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रामध्ये मानसोपचारतज्ञ डॉ. सचिन हेमके यांनी योजना १ अंतर्गत कलम ५.२ नुसार मानसिक आजारी असलेल्या व्यक्ती आणि बौद्धिक विकलांग व्यक्तींचे हक्क व अधिकार तसेच मानसिक आजाराबाबत मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रामध्ये मानसोपचार समुपदेशक केशव होळंबे यांनी सुरवातीपासून मानसिक आजार व बौद्धिक विकलांगता कशी ओळखायची, मानसिक आजारी व बौद्धिक विकलांग व्यक्ती व साधारण व्यक्ती यातील फरक कसा ओळखायचा याबाबत मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे चौथ्या सत्रामध्ये मुख्य लोक अभिरक्षक एस. एस. भट यांनी मानसिक आजारी असलेल्या व्यक्ती आणि बौद्धिक विकलांग व्यक्तींकरीता कायदेविषयक सेवा योजना, २०२४ या बाबत कायदेविषयक माहिती दिली.

दुसऱ्या दिवशीच्या प्रथम सत्रामध्ये सहा. लोक अभिरक्षक अ‍ॅड. स्नेहा मेश्राम, यांनी महिला संरक्षण गृह, बाल संगोपन गृह, अनाथालय, कारागृह इ. ठिकाणी मानसिक आजारी असलेल्या व्यक्ती आणि बौद्धिक विकलांग व्यक्तींकरीता कशाप्रकारे कायदेविषयक सहाय्य देता येईल याबाबत मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रामध्ये डॉ. मनिष मेश्राम यांनी मानसिक आजारी असलेल्या व्यक्ती आणि बौद्धिक विकलांग व्यक्तींकरीता कायदेविषयक सेवा बाबत सदस्यांची भूमिका आणि जबाबदारी, त्याचप्रमाणे रुग्णालयात मानसिक आजारी असलेल्या व्यक्ती आणि बौद्धिक विकलांग व्यक्तींवर होणारे उपचार याबाबत सखोल मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रामध्ये जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी शंतनू पाटील यांनी इतर सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने आणि सहभागाने समाजामध्ये जाणीवजागृती कशाप्रकारे करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशीच्या शेवटच्या सत्रामध्ये सामाजिक कार्यकर्ते पी. जी. सोनटक्के यांनी मानसिक आजारी लोकांप्रती समाजाचा दृष्टीकोन कसा असावा या बाबत विचार मांडले.

प्रशिक्षण कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन कनिष्ठ लिपीक जे. एम. भोयर यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक पी. व्ही. भागवतकर, वरिष्ठ लिपीक एन. आर. भलमे, कनिष्ठ लिपीक एम. डी. गुरनुले, एस. एन. आळे, एस. के. चुधरी, एच. एम. गायमुखे, एन. यु. बुरांडे, आर. एस. नेरकर, एस. ए. शेबे, जे.डी. खोब्रागडे, त्याचप्रमाणे शिपाई एस. डब्ल्यू. वासेकर, एस. एस. नंदावार, शिल्पा धोंगडे यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button