
पवनी आय.टी.आय येथे जागतिक युवा दिन कार्यक्रम
भंडारा : १२ जानेवारी, २०२५ रोजी स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पवनी येथे जागतिक युवा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले असून त्यानिमित औद्योगिक प्रशिक्षण संस्था, व्यवस्थापन दिनाचे कार्यक्रमाला अध्यक्ष तसेच, सदस्य व संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाअंतर्गत संस्थेतून उत्तीर्ण झालेले व यशस्वी उद्योजक म्हणून नावारुपास आलेल्या विद्यार्थ्याचा गौरव व वर्षभरात आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा देखिल गौरव करण्यात येणार आहे.
तसेच शासकीय औद्योगिक संस्थेमध्ये विविध कार्यशाळा आणि सेमिनार आयोजित करण्यात येणार असून त्याद्वारे याद्वारे युवा सशक्तीकरण मानसिक आरोग्य, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, संस्थेच्या यशस्वी उद्योजक म्हणून नावारुपास आलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून स्वयंरोजगाराबाबत मार्गदर्शन, आणि नेतृत्व विकास यावर चर्चा सत्र/प्रबोधन सत्राचे देखिल आयोजन करण्यात आलेले आहे. तरी या कार्यक्रमाला विद्यार्थी तसेच पालक यांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पवनी यांनी केले आहे.



