चंद्रपूरविदर्भ

दोघांचा बळी घेणारा वाघ जेरबंद

चंद्रपूर : काही दिवसांपूर्वी वाघाने एक महिला व एका पुरुषाला ठार केल्याची घटना घडली होती. त्यामुळे परिसरात या वाघाची दहशत होती. वाघाला जेरबंद करण्यासाठी सहायक वनसंरक्षक प्रकाश अवदूतवार हे रेस्क्यू टीम व वन कर्मचाऱ्यांसह वाघाच्या हालचालींवर नजर ठेवून होते. अखेर ३१ डिसेंबरला रात्री १० च्या सुमारास विरूर वनविभागातील अंतरगाव नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक १३३ मध्ये वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले.

तेलंगणा-महाराष्ट्र राज्य सीमेवरील विरूर वनपरिक्षेत्राचा भाग हा आदिवासी अतिदुर्गम परिसर म्हणून ओळखल्या जातो. तेलंगणा महाराष्ट्र वनविभागाची सीमा ही एकमेकांना अगदी जवळ असल्याने तेलंगणातील काही वाघ विरूर वनविभागाच्या हद्दीत शिरकाव करताना दिसून आले आहेत. १८ डिसेंबरला बगूलवाई येथील शेतकरी जंगू रामू आत्राम हे कापूस वेचणीसाठी गेले असता अचानक वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना ताजी असतानाच कविटपेठ येथील महिला वच्छलाबाई अर्जुन आत्राम हिला कापूस वेचणी करताना ठार केले. ही घटना २३ डिसेंबरला घडली. वाघाच्या दहशतीमुळे परिसरात काही शेतकऱ्यांनी शेतपीक रक्षणाची जागल सोडून दिली. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, महिला, नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मध्य चांदाच्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू व उपविभागीय परिविक्षाधीन वनअधिकारी पवन कुमार जोंग यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक प्रकाश अवदूतवार यांनी दोन्हीही घटनास्थळी ३० कॅमेरे लावून रेस्क्यू पथक टीम, क्षेत्र सहायक, वनरक्षक, वनमजूर, गस्ती पथक वाघाचा मागोवा घेत होते. दरम्यान, ३१ डिसेंबरला रात्री १० च्या सुमारास विरूर वनविभागात येणाऱ्या अंतरगाव नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक १३३ मध्ये वाघ दिसताच शार्प शूटरने बेशुद्ध केले व पिंजऱ्यात जेरबंद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button