नागपूरविदर्भ

कऱ्हांडला अभयारण्यातील ४ जिप्सी चालक, ४ गाईड निलंबित

वाघिणीला बछड्यांसह घेरल्याचे प्रकरण ; अभयारण्य प्रशासनाची कारवाई 

नागपूर : उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील प्रसिद्ध एफ-२ वाघिणीला तिच्या बछड्यांसह समोरून व मागून घेरल्याच्या प्रकरणात जिप्सीचे ४ चालक व ४ गाईड यांना अभयारण्य प्रशासनाने ७ दिवसांसाठी निलंबित केले आहे. तर जिप्सी चालकांवर अडीच हजार व गाइडला ४५० रुपये प्रति व्यक्ती दंड लावण्यात आला आहे.

मंगळवारी या जिप्सी चालकांनी व गाईडने गोठणगाव तलावाजवळ वाघीण व तिच्या ५ बछड्यांसह जात असताना रस्त्यावर बराच वेळ घेरून ठेवले होते. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर झाला होता. त्यामुळे पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक व कऱ्हांडला अभयारण्याचे प्रभारी डॉ. प्रभूनाथ शुक्ला यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी आरती उईके यांना चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर अभयारण्य प्रशासनाने ही कारवाई केली आहे.

वन्यजीव तज्ज्ञांच्या मते पेंच, ताडोबा व अन्य व्याघ्र प्रकल्पासह अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची गती, वाहने कुठे थांबतात यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक ऍप बनविण्यात आले आहे. जर नियमांचे उल्लंघन होत असेल तर गुन्हा नोंदविला जातो. जंगलांमध्ये वाघाजवळून कुठलेही वाहन ३० मीटर दूर असले पाहिजे. वाघाच्या मागेपुढे वाहने उभी करणे हे चुकीचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button