गडचिरोलीविदर्भ

गडचिरोली शहराबाहेर ‘रिंग रोड’ आणि इंदिरा चौकात ‘फ्लाय ओव्हर’ बांधा

अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाची मागणी

गडचिरोली : गडचिरोली शहरात दिवसेंदिवस वाढत असलेली वाहतूक कोंडी आणि त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन, अवजड वाहनांसाठी शहराबाहेरून आऊटर रिंग रोड आणि मुख्य चौकात फ्लाय ओव्हर (Fly Over) चे बांधकाम करण्याची मागणी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने केली आहे.

पक्षाने निवेदनात नमूद केले आहे की, मागील काही वर्षांपासून गडचिरोली शहरात वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अवजड वाहनांची वाहतूक शहरातूनच होत असल्याने वाहतुकीची कोंडी नित्याची झाली आहे. वाहतूक कोंडीमुळे गंभीर आजारी रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाताना अतिशय विलंब होतो. वाढत्या वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे, ज्यामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे.

ही वाहतूक कोंडी थांबविण्यासाठी पक्षाने दोन महत्त्वाचे उपाय सुचवले आहेत: अवजड वाहनांसाठी शहराबाहेरून रिंग रोड बांधणे अनिवार्य झाले आहे. शहरातील मुख्य चौक असलेल्या इंदिरा चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी चामोर्शी मार्गावरील सायन्स कॉलेज ते आरमोरी मार्गावरील फॉरेस्ट नाका आणि धानोरा रोडवरील सिटी हार्ट हॉटेल ते चंद्रपूर रोडवरील न्यायालय चौकापर्यंत फ्लाय ओव्हर बांधण्यात यावा.

यावेळी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे, प्रदेश सचिव प्राचार्य प्रकाश दुधे आणि शहर अध्यक्ष अनिल बारसागडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button