गडचिरोलीविदर्भ

सिरोंचात शालेय विद्यार्थ्यांची रस्ता सुरक्षा व स्वच्छता रॅली

सिरोंचा : महाराष्ट्र पोलिस दल स्थापना दिनाचे औचित्य साधून प्रोजेक्ट उड्‌डाण अंतर्गत गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक प्राणहिता श्रेणिक लोढा यांच्या संकल्पनेतून व उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा संदेश नाईक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन सिरोचा येथे रेझिंग डे सप्ताह दरम्यान जिल्हा परिषद माध्यमिक शाळा सिरोंचा, कस्तुरबा गांधी बालिका वि‌द्यालय सिरोंचा, ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल सिरोंचा येथील वि‌द्यार्थ्यांना बोलावून सिरोंचा शहरातून रॅली काढून विविध घोषणाफलक, बॅनरच्या माध्यमातून नागरिकांना महिला सुरक्षा, रस्ता सुरक्षा, स्वच्छता व व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला.

तसेच पोलीस स्टेशन येथे शस्त्र प्रदर्शन दाखवण्यात आले. त्यात विविध शस्त्राविषयी, सायबर गुन्ह्यांविषयी व पोलीस स्टेशनच्या कामकाजाबाबत सर्व वि‌द्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. सदर कार्यक्रमांमध्ये 600 ते 700 विद्यार्थ्यांनी शाळेतील शिक्षकांसह भाग घेतला. त्यांना चहा, बिस्किट व चॉकलेट वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button