पत्रकार मुकेश चंद्रकार यांच्या हत्येची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी – जिल्ह्यातील पत्रकारांची मागणी

गडचिरोलीत पत्रकारांचा मूकमोर्चा ; जिल्हाधिकारी यांना निवेदन
गडचिरोली : एनडीटीव्ही व बस्तर जॅक्शनचे छत्तीसगड येथील पत्रकार मुकेश चंद्रकार यांची निघृण हत्या करण्यात आली. या प्रकरणाची योग्य ती चौकशी करून त्यांच्या मारेकरांना फाशिची शिक्षा देण्यात यावी. तसेच गडचिरोली जिल्हयात रेती, मुरूम माफीया, दारू विक्रेते यांचे अवैध धंदे बंद करावे तसेच जिल्ह्यातील पत्रकार हे वृत्तांकन करण्यासाठी नक्षलग्रस्त भागात जात असतात मुकेश चंद्राकार यांची पुर्नरावृत्ती गडचिरोली जिल्हयात होवू नये. महाराष्ट्र शासन अधिनियम सन २०१९ क्र. ९ दि. ८/१०/२०१९ राजपत्रानुसार जिल्ह्यातील पत्रकारांना संरक्षण देण्यात यावे आदी मागण्यांकरिता गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढून जिल्हाधिकारी अविशांत पंडा व पोलीस अधिक्षक निलोत्पल यांच्या मार्फतीने देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री छत्तीसगड, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

सदर मोर्चात पत्रकार व्येंकटेश दुडमवार, प्रा. मुनिश्वर बोरकर, संजय तीपाले, सुरेश पद्मशाली, मुकुंद जोशी, उदय धकाते, हेमंत डोर्लीकर, प्रल्हाद म्हशाखेत्री, प्रकाश ताकसांडे, प्रकाश दुबे, जगदिश कन्नाके, मारोती भैसारे, विलास ढोरे, सुरज हजारे, राजरतन मेश्राम, प्रा. दिलीप कवरके, नाशिर जुम्मन शेख, हेमंत हुनेदार, महेश सचदेव, दिनेश बनकर, कृष्णा वाघाडे, हस्ते भगत, नाझिर शेख, भाविकदास कळमकर, मुकेश हजारे, संदिप कांबळे, विनोद कुळवे, किशोर खेवले, सोमनाथ उईके, निलेश सातपुते, श्रीमंत सुरपाम, शंकर ढोलगे, जयंत निमगडे, हर्ष साखरे, कबिर निकुरे, प्रमोद राऊत, विजय शेडमाके, टावर मडावी, उमेश गझपल्लीवार, पुंडलिक भांडेकर, अनुप मेश्राम, श्रावण वाकोडे, कालिदास बुरांडे, धनराज वासेकर, विलास वाळके, गोर्वधन गोटाफोटे, रवि मंडावार, राजेश खोब्रागडे, चोखोबा ढवळे, सतीश टेम्भूर्णे, गेडाम, धम्मपाल दुधे, नाजुक भैसारे, रेखाताई वंजारी, विजया इंगळे, तिलोतमा हाजरा आदि सहित जिल्ह्यातील दीडशे पत्रकार उपस्थित होते.



